Carlos Alcaraz French Open Final: कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता; तब्बल साडेपाच तासाच्या संघर्षानंतर पाचव्यांदा ग्रँड स्लॅम जेतेपदावर मोहोर
Carlos Alcaraz French Open Final: कार्लोस अल्कराजने अंतिम लढतीत अल्कराजने यानिक सिनरवर मात केली. विजयासाठी अल्कराजचा तब्बल साडेपाच तास संघर्ष सुरु होता.

Carlos Alcaraz French Open Final: स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं (Carlos Alcaraz) फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत (French Open Final 2025) सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तब्बल साडेपाच तास चाललेल्या अंतिम लढतीत कार्लोसनं टायब्रेकरवर इटलीच्या यानिक सिनरचा पराभव केला. आश्चर्याची बाब म्हणजे फायनलमध्ये पहिले दोन्ही सेट कार्लोसनं 4-6, 6-7 अशा फरकानं गमावले होते. पण त्यानंतर त्यानं पुढचे तीनही सेट्स 6-4, 7-6, 7-6 असे जिंकून फ्रेंच ओपनच्या लाल मातीत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
3 | Le nombre de balles de match écartées par Carlos Alcaraz. Il devient le premier joueur de l'ère Open à avoir sauvé 3 balles de match en finale pour remporter un titre du Grand Chelem 🤯
— Roland-Garros (@rolandgarros) June 8, 2025
Les six chiffres à retenir de la légendaire finale ⤵️#RolandGarros
अंतिम लढतीत अल्कराजने यानिक सिनरवर मात केली. विजयासाठी अल्कराजचा तब्बल साडेपाच तास संघर्ष सुरु होता. दोन सेटच्या पिछाडीनंतरही अल्कराजने चांगली मुसंडी मारली आणि निर्णायक टायब्रेकरमध्ये अल्कराज 10-2 ने विजयी झाला. 22 वर्षांच्या अल्कराजचं आजवरचं हे पाचवं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानं आतापर्यंत दोन वेळा फ्रेन्च ओपन, दोन वेळा विम्बल्डन आणि एकदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
Today's roller-coaster final is our Extraordinary Moment by @HaierOfficial 🎢#RolandGarros pic.twitter.com/5Af9R71449
— Roland-Garros (@rolandgarros) June 8, 2025
5 तास 29 मिनिटे चालला अंतिम सामना-
विजेतेपदाची लढत जवळपास 5 तास 29 मिनिटे चालली. फ्रेंच ओपनच्या इतिहासातील ही सर्वात लांब अंतिम फेरी आहे. आतापर्यंत कोणत्याही फ्रेंच ओपनची अंतिम फेरी 5 तासांपर्यंत पोहोचलेली नव्हती. यापूर्वी 1982 चा अंतिम सामना 4 तास 20 मिनिटे चालला. त्या सामन्यात मॅट्स विलांडरने गिलेर्मो विलासचा पराभव केला. 2012 मध्ये नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्यात सर्वात लांब ग्रँड स्लॅम अंतिम फेरी झाली. हा सामना ऑस्ट्रेलियन ओपनचा होता.
अंतिम फेरीत अल्काराज अजिंक्य-
ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत अल्काराज अजिंक्य राहिलेला आहे. कार्लोस अल्काराजचा हा चौथा ग्रँड स्लॅम अंतिम फेरी होता. अल्काराजने अंतिम फेरीचे सर्व सामने आतापर्यंत जिंकले आहेत. त्याने 2022 मध्ये पहिल्यांदाच यूएस ओपन जिंकले. त्यानंतर, त्याने 2023 मध्ये विम्बल्डन जिंकले. 2024 मध्ये फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन दोन्ही जिंकले. आता पुन्हा एकदा अल्काराजने फ्रेंच ओपन जिंकले आहे. 23 वर्षीय सिनेरच्या नावावर तीन ग्रँड स्लॅम विजेतेपदे आहेत.






















