इतिहास रचणारा धावपटू बोल्टची इच्छा काय?

वास्तविक, जमैकाच्या या दिग्गज धावपटूने सुवर्ण पदक जिंकूनही आपल्या प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली आहे. 200 मीटर स्पर्धेपूर्वी त्याने जुने विश्वविक्रम मोडीत काढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
''मला सर्वात जलद धावायचे होते. यासाठी मी प्रयत्नदेखील केले. मात्र, माझ्या शरीराने मला तशी साथ दिली नाही.'' यानंतर बोल्टने रिओ ऑल्मिपिकनंतर निवृत्तीचा विचार बोलून दाखवला.

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेलेने तीनवेळा फुटबॉलचा विश्व चषक जिंकला होता.
''मला अली आणि पेलेसारख्या जगातील दिग्गज खेळांडूप्रमाणे बनण्याची इच्छा आहे. ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर माझा या श्रेणीत समावेश होईल अशी अपेक्षा आहे,'' असे त्याने यावेळी बोलून दाखवले.
जमैकाचा दिग्गज धावपटू उसेन बोल्टने पेले आणि मोहम्मद अली या दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीत आपला समावेश व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. बोल्टने रिओ ऑलिम्पिकच्या 200 मीटर स्पर्धेत विजय मिळवून आणखी एक सुवर्ण पदक पटकावले.
या विजयानंतर बोल्टने आपल्याला जगातील सर्वात श्रेष्ठ धावपटू बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बोल्टने सलग तीन वेळा ऑलिम्पिकच्या 100 आणि 200 मीटरच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम केला आहे. बोल्टने ही स्पर्धा 19.78 सेकंदात पूर्ण केली. या पर्वातील बोल्टचा हा नवा विक्रम आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -