चेन्नई सुपरकिंग्जचे सामने सध्या पुण्यात होणार आहेत. मात्र 23 आणि 25 मे रोजी होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हालवण्याच्या ठिकाणी सुरु आहेत.
''पुण्याच्या मैदानापेक्षा लखनौच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या जास्त आहे. अंदाजे 50 हजार प्रेक्षक लखनौच्या मैदानात सामना पाहू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मैदानाची चाचपणी करुन अंतिम निर्णय घेतला जाईल,'' असं बीसीसीआयमधील सूत्रांनी म्हटलं आहे.
लखनौसोबत राजकोट आणि कोलकाता या दोन ठिकाणीही प्लेऑफचे सामने हलवले जाऊ शकतात. मात्र बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह प्लेऑफचे सामने राजकोटच्या मैदानावर खेळवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्ज आपले घरचे सामने पुण्याच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे बीसीसीआय प्लेऑफचे सामने अन्यत्र हलवण्याच्या मनस्थितीत आहे.
दरम्यान, पुण्यात नुकत्याच खेळवण्यात आलेल्या चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याची तिकिटं अनेक प्रेक्षकांना मिळाली नव्हती. तिकिटं लवकर बूक झाल्यामुळे चाहत्यांच्या हाती निराशा लागली. धोनीचा संघ पुण्यात खेळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
पुण्याच्या मैदानात पुढचा सामना 28 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपरकिंग्जसोबत होणार आहे. यापूर्वी आयपीएलच्या सलामीला झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर मात दिली होती. आता मुंबई चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर मात देऊन बदला घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :