नवी दिल्ली : बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बारा महिन्यांसाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर बीसीसीआयनेही मोठी निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्येही या दोघांना खेळता येणार नाही, असं आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं.
सर्व फ्रँचायझींनी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची रिप्लेसमेंट करणं गरेजचं आहे. कारण, ते दोघेही यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.
राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली. तर वॉर्नरनेही सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
स्मिथ, वॉर्नरवर एका वर्षाची बंदी
बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटवर तब्बल एक वर्षाची बंदी घालण्यात आली. तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) याबाबतचा निर्णय घेतला.
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तात्काळ चौकशी पूर्ण करत स्मिथ आणि वॉर्नरवर बंदीची कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणात स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट हे तीनच खेळाडू दोषी आढळले होते. या तीनही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफीही मागितली.
काय आहे प्रकरण?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (तिसऱ्या) केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथनं याची कबुलीही देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं.
बॅनक्रॉफ्टचं चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलंच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरुन पायउतार झाला, तर डेव्हिड वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला.
आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!
VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील
व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं
क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
स्मिथ आणि वॉर्नरची आयपीएलमधूनही हकालपट्टी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2018 03:28 PM (IST)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर बीसीसीआयनेही मोठी निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्येही या दोघांना खेळता येणार नाही, असं आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -