लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशने न्यूझीलंडवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 266 धावांचं आव्हान बांगलादेशच्या फलंदाजांनी सहजपणे पार केलं. यासोबतच न्यूझीलंड संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे.

बांगलादेशची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर शकीब अल हसन आणि महमदुल्ला यांनी अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.

शकीबने 115 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार शतक पूर्ण करत 114 धावा ठोकल्या. तर महमदुल्लाने नाबाद 102 धावा ठोकून बांगलादेशच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली.

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बांगलादेशला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडला 8 बाद 265 एवढीच धावसंख्या उभारता आली, ज्याचा पाठलाग बांगलादेशने सहजपणे केला. त्यामुळे आता न्यूझीलंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.