Australian Open final 2026 Elena Rybakina Win Title : ऑस्ट्रेलियन ओपन 2026 च्या महिला एकेरीचा अंतिम सामना 31 जानेवारी रोजी रॉड लेवर एरिनामध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर-1 खेळाडू एरिना सबालेंका आणि कझाकस्तानची एलिना रिबाकिना यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना अवघ्या तीन सेटमध्येच संपला. चाहत्यांना या सामन्यात एरिना सबालेंकाचे वर्चस्व पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात रिबाकिनासमोर सबालेंका पूर्णपणे दबावाखाली दिसली. अखेरीस रिबाकिनाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत महिला एकलचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
एलिना रिबाकिना ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणारी कझाकस्तानची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तसेच, हे तिच्या कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिने 2022 साली विंबल्डनचे विजेतेपद जिंकले होते.
दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाचं जोरदार पुनरागमन, पण...
एरिना सबालेंका आणि एलिना रिबाकिना यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचा आढावा घेतला, तर पहिला सेट रिबाकिनाने 6-4 असा जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने जबरदस्त खेळ करत रिबाकिनाला कडवी झुंज दिली आणि 6-4 असा सेट जिंकत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते, मात्र या सेटमध्ये सबालेंकाला आपली लय कायम राखता आली नाही. रिबाकिनाने हा सेटही 6-4 असा जिंकत सामना 2-1 असा आपल्या नावावर केला.
मागील पराभवाचा घेतला बदला
एलिना रिबाकिना याआधी 2023 च्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकल अंतिम फेरीत एरिना सबालेंकासमोर पराभूत झाली होती. त्या सामन्यात सबालेंकाने विजय मिळवला होता. मात्र, यंदा विजेतेपद जिंकत रिबाकिनाने त्या पराभवाचा बदला घेतला.
तसेच, ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकलचे विजेतेपद जिंकताना टॉप-6 खेळाडूंना पराभूत करणारी रिबाकिना, 2008 साली हे कारनामा करणाऱ्या मारिया शारापोवानंतर केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे.
हे ही वाचा -
IND vs PAK सामन्याआधीच अनर्थ; पाकिस्तानी विकेटकीपरचं नाक तुटलं, बदली खेळाडूची घोषणा
