Australia vs India, 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये खेळू शकतो. खुद्द मार्शने ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्याच्या फिटनेसबाबत मार्शने मुलाखतीत सांगितले की, तो पूर्णपणे ठीक आहे, तो दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
पर्थ कसोटीनंतर मिचेल मार्शला वेदना होत होत्या
पर्थ कसोटीनंतर मार्शच्या स्नायूंना ताण आला होता. मार्शच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले होते की, 'मार्शच्या फिटनेसबद्दल काही शंका आहे.' ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही मार्शच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली होती. मार्शला दुखापत झाल्यानंतर तस्मानियाचा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला होता. वेबस्टर फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजीसह फलंदाजी करू शकतो. वेबस्टरने भारत-अ विरुद्धच्या अनधिकृत कसोटीच्या चार डावांत दोनदा नाबाद असताना 145 धावा केल्या होत्या. तसेच सात विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर सिडनीतील शेफिल्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्सविरुद्ध त्याने 61 आणि 49 धावा केल्या आणि 5 बळीही घेतले.
टीम इंडिया BGT 1-0 ने आघाडीवर
भारत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत 295 धावांनी पराभव केला. बॉर्डर-गास्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. सध्या भारतीय कसोटी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 295 धावांनी विजय मिळवला आहे.
सलामीची मोठी जबाबदारी केएल राहुलवर येणार?
त्याआधी, भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन यांच्यात सराव सामना खेळला गेला, ज्यामध्ये त्यांनी 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठा निर्णय घेत केएल राहुलसाठी सलामीला संधी दिली. वास्तविक, केएल राहुलने सराव सामन्यात यशस्वी जैस्वालसोबत सलामी दिली. या दोघांनी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही सलामी दिली होती. रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळला नाही. पण आता कर्णधार परतला आहे. अशा स्थितीत रोहितने सलामी दिली नाही आणि तो सराव सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
रोहित जरी फ्लॉप ठरला. 11 चेंडू खेळून त्याला केवळ 3 धावा करता आल्या. कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेड येथे होणार आहे. अशा स्थितीत राहुल आणि यशस्वी सलामी देऊ शकतात हे समजू शकते. तर रोहित मधल्या फळीत येऊ शकतो. अशाप्रकारे, गुलाबी चेंडू कसोटीत पुन्हा एकदा सलामीची मोठी जबाबदारी केएल राहुलवर येणार असल्याचे समजते.
इतर महत्वाच्या बातम्या