Asian Games 2026 Kumkum Mohod:महाराष्ट्राचीलेकआणिभारताचीमानपुन्हाएकदाअभिमानानंउंचावणारीअमरावतीची सतरा वर्षीय कुमकुम मोहोडने (Kumkum Mohod) आशियाई क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक 'रिकर्व्ह' तिरंदाजी प्रकारात (Women's Recurve Team) सुवर्णपदक जिंकून पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. सोबतच ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरलीआहे. कुमकुमने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या ओह येजिनचा पराभव करून आपल्या या स्वप्नवत प्रवासाचा सुवर्णमय कळस गाठला आणि भारतीय तिरंदाजीच्या इतिहासात एक सुवर्ण मैलाचा दगड रोवला आहे. आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2026) महिलांच्या 'रिकर्व्ह वैयक्तिक' प्रकारात भारतासाठी पहिलेवहिले पदक जिंकले आहे. शिवायती गोल्फमध्ये प्रणवी उर्स अंतिम फेरीत आघाडीवर असून तिने भारतासाठी दोन ऐतिहासिक पदके जिंकण्याची आशा जिवंत ठेवली आहे. (Kumkum Mohod News in Marathi)
Amravati News : सुवर्णकामगिरीनंतर कुमकुमच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
दरम्यान, यासुवर्णकामगिरीनंतर कुमकुमच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेआहे. तरवडिलांनी कुमकुमच्याकामगिरीचंतोंडभरूनकौतुककरतभावुकप्रतिक्रियादिलीआहे. अमरावतीची 17 वर्षीय सुप्रसिद्ध धनुर्धर कुंकूम अनिल मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी (रिकर्व्ह) प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे. बेताच्या कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत कुंकूमने आपल्या अफाट कौशल्याच्या आणि जिद्दीच्या जोरावर देशाचे आणि अमरावती शहराचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमच्या आनंद व्यक्तकार्यालाशब्दनाहीत. जिद्दीनेतिनेहेयशसंपादनकेलंआहे. तिचातिच्या प्रशिक्षकांवरपूर्णविश्वासअसूनतिच्या वडिलांचातिलापूर्णसहकार्यआहे. कुमकुमने आजदेशाचंनावपुन्हाएकदाउंचावलंअसूनआम्हालातिचासार्थअभिमानअसल्याचीभावना, कुमकुमच्या आईनेव्यक्तकेलीआहे. यावेळीबोलतानात्यांच्याडोळ्यात आनंदाश्रू तरळलेहोते.
Kumkum Mohod: आजीने दिलेल्या पैशातून विकत घेतलंपाहिलं धनुष्याबाण, जागतिक पाताळीवर उंचावलंदेशाचंनाव
कुमकुमच्या जिद्दीचीआणि यशाची कथा सुरू होते 3000 रुपयांच्या एका लाकडी धनुष्यापासून, जे तिच्या आजीने दिलेल्या पैशातून विकत घेतले होते. आठ वर्षांनंतर, तीच मुलगी जपानमधील स्पर्धेत विजेत्यांच्या मंचावर (पोडियमवर) उभी होती, तिच्या गळ्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक होते आणि 'रिकर्व्ह आर्चरी'मध्ये वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.सुरुवातीच्या काळात कोणतीही आलिशान अकादमी किंवा महागडे साहित्य उपलब्ध नव्हते. कुमकुमने तिच्या कुटुंबाला जमेल तसे साहित्य जमवून सराव केला. याची सुरुवात 3000 रुपयांच्या त्या लाकडी धनुष्यापासून झाली.
कोविडच्या काळात जेव्हा नियमित सराव थांबला, तेव्हा तिने आणि तिचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी सराव थांबवला नाही. त्याऐवजी, त्यांनी कमी अंतरावरील नेमबाजीचा सराव (ड्रिल्स) केला, याद्वारे तिने आपली ताकद वाढवली आणि प्रत्येक सत्रागणिक आपल्या तंत्रात सुधारणा केली. तिचे अलीकडील विजयही सामान्य दर्जाच्या साहित्याच्या जोरावरच मिळाले आहेत. यावर्षी शांघाय येथे झालेल्या 'वर्ल्ड कप स्टेज २' मध्ये 'रिकर्व्ह टीम' प्रकारात सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिने वापरलेले धनुष्य हे 'सेकंड-हँड' (जुने) होते; पदक जिंकले तेव्हा ते धनुष्य आधीच पाच वर्षे जुने झाले होते. जपानमध्ये दाखल झाली तेव्हा कुमकुम जबरदस्त लयीत होती. तिने सुरुवातीला अंकिता भकत आणि कीर्ती शर्मा यांच्यासह 'रिकर्व्ह टीम' प्रकारात दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
त्यानंतरच्या दिवशी, धीरज बोम्मादेवरा यांच्या जोडीने तिने 'मिक्स्ड टीम' प्रकारात रौप्यपदक मिळवले. त्यानंतर वैयक्तिक स्पर्धेची वेळ आली. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक आणि जागतिक विजेत्या कांग चे-यंगचा, तर उपांत्य फेरीत जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या खेळाडूचा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली, जिथे तिचा सामना दक्षिण कोरियाच्या ओह ये-जिनशी झाला. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला; पाच सेट्सनंतर गुण 5-5 असे बरोबरीत सुटल्याने 'शूट-ऑफ'ची वेळ आली. ओहने 8 गुणांचा वेध घेतला. कुमकुमने संयम राखला आणि अचूक 10 गुणांचा वेध घेतला. त्या एका बाणाने तिला आशियाई क्रीडा स्पर्धेची विजेती बनवले.
इतर महत्वाच्या बातम्या
