एक्स्प्लोर

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाकडून मलेशियाचा 5-1 ने धुव्वा, एशियन गेम्समध्ये पाचव्यांदा सुवर्णपदक, ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के

India Hockey Gold Medal Asian Games 2026 : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा एकतर्फी पराभव केला.

मुंबई : जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारतीय पुरुष हॉकी संघाने (India Mens Hockey Team) इतिहास रचला आहे. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा (Malaysia) 5-1 अशा दणदणीत फरकाने पराभव करत सुवर्णपदक (Gold Medal) आपल्या नावे केले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकण्याची ही तब्बल पाचवी वेळ आहे.

LA Olympics 2028 Qualification : ऑलिम्पिक 2028 चे तिकीट पक्के

या ऐतिहासिक विजयासह भारतीय पुरुष हॉकी संघाने 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (LA Olympics 2028) थेट पात्र ठरण्याचा पराक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारा भारत हा पाकिस्तान आणि दक्षिण कोरियानंतरचा केवळ तिसरा देश ठरला आहे.

India vs Malaysia Hockey Final Highlights : असा रंगला अंतिम सामना

सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांत दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली आणि पहिला क्वार्टर 1-1 असा बरोबरीत सुटला. मात्र, दुसऱ्या क्वार्टरनंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारतीय संघाने आक्रमक खेळ करत मलेशियाला चुका करण्यास भाग पाडले आणि सामन्यात तब्बल 14 पेनल्टी कॉर्नर मिळवले. 

भारताकडून शिलानंद लकडा याने एकमेव उत्कृष्ट 'फिल्ड गोल' केला. तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून 2 गोल, जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून 1 गोल आणि हार्दिक सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर 1 गोल डागला. मलेशियाकडून एकमेव गोल शेलो सिल्व्हेरिअस याने केला.

Asian Games 2026 Medal Tally India : पदकांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर

पुरुष हॉकी संघाच्या या सुवर्णपदकामुळे 2026 च्या एशियन गेम्समध्ये भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 21 वर पोहोचली असून एकूण पदकांची संख्या 85 झाली आहे. या विजयासह भारताने पदक तक्त्यात उझबेकिस्तानला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे.

सुवर्णपदक (Gold) : भारत (5-1 ने विजय)

रौप्यपदक (Silver) : मलेशिया

कांस्यपदक (Bronze) : पाकिस्तान (दक्षिण कोरियाचा 5-3 ने पराभव करत कांस्यपदक पटकावले).

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2027 ODI World Cup India : वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
IND vs WI 1st T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात होणार बदल; ODI संघामधील 13 खेळाडू OUT, अशी असेल Playing XI
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात होणार बदल; ODI संघामधील 13 खेळाडू OUT, अशी असेल Playing XI
IND vs WI 1st T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी OUT, संजू-अभिषेक सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
वैभव सूर्यवंशी OUT, संजू-अभिषेक सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
IND vs WI 1st T20 : टीम इंडियाच्या सामन्याची वेळ बदलली! वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना किती वाजता होणार सुरू?, जाणून घ्या A टू Z
टीम इंडियाच्या सामन्याची वेळ बदलली! वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना किती वाजता होणार सुरू?, जाणून घ्या A टू Z
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget