दुबई : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत काल पार पडली. या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा 7 विकेटनं पराभव केला. या मॅचच्या नाणेफेकीच्या वेळी आणि मॅच संपल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नव्हतं. यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे तक्रार करत सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. आयसीसीनं पाकिस्तानची ही फेटाळली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे केलेली विनंती फेटाळून लावण्यात आली आहे. आयसीसीनं सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी फेटाळण्याचं कारण देखील दिलं आहे. खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यामध्ये अँडी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मोठी नव्हती, असं आयसीसीनं म्हटलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अँडी पायक्रॉफ्ट यांची सामनाधिकारी पॅनेलमधून हकालपट्टी न केल्यास आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी दिली होती. आयसीसीनं या धमकीला अजिबात किंमत दिलेली नाही. आयसीसीनं पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं आणि आशियाई क्रिकेट परिषदेनं भारताला कोणत्याही प्रतिबंधांचा सामना करावा लागणार नाही. भारतानं पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये 7 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने आल्यास भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव हस्तांदोलनावरील बहिष्कार कायम ठेवेल.
भारतानं पाकिस्तानवर 7 विकेटनं विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंग रुमकडे निघून गेले. मॅचनंतर होणारं पारंपारिक हस्तांदोलन टाळलं. पाकिस्तानचे काही खेळाडू काही वेळ मैदानावर थांबले होते. भारताच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यानं पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सहभागी झाला नाही.
भारत सुपर 4 मध्ये दाखल
आशिया चषकातील अ गटात भारतानं दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यूएई आणि पाकिस्तानवर भारतानं विजय मिळवत 4 गुण मिळवले. पाकिस्ताननं ओमानवर विजय मिळवला. तर, यूएईनं देखील ओमानवर विजय मिळवला. यामुळं भारत सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे. आता अ गटातून पाकिस्तान किंवा यूएई पैकी एक संघ सुपर 4 मध्ये जाईल.
आशिया कपमधील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी221 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2 23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी124 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी225 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी226 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी128 सप्टेंबर – अंतिम सामना