Asia Cup 2025 Hockey: आशिया चषक हॉकी 2025 ची स्पर्धा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतातील बिहारच्या राजगीरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र याचदरम्यान आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. भारतात येऊन हॉकीचा सामना खेळण्यासाठी येण्यास पाकिस्तानच्या संघाने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकीचा सामना रद्द होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आशिया चषक हॉकीच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघांचा समावेश होता. परंतु आता पाकिस्तानच्या हॉकी संघाने भारतात येण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर भारताच्या हॉकी व्यावस्थापनाने दुसऱ्या देशाला आशिया चषकाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे. दरम्यान, या स्पर्धेत जेतेपद पटकावणार संघ नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक 2026 च्या स्पर्धेसाठी पात्र ठरेल.
भारताकडून बांगलादेशला आमंत्रण-
भारताच्या हॉकी व्यावस्थापनाने सदर प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, भारत सरकार पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास तयार होती. परंतु सुरक्षेचं कारण पुढे करत पाकिस्तान हॉकी महासंघाने भारतात येण्यास नकार दिला. पाकिस्तानने भारतात येऊन आशिया चषक हॉकीची स्पर्धा खेळण्यास नकार दिल्यानंतर भारताकडून बांगलादेशला आमंत्रण देण्यात आले आहे.
2025 च्या आशिया कपमध्ये कोणते संघ खेळतील?
भारतचीनजपानमलेशियादक्षिण कोरियापाकिस्तान (स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे)ओमानचिनी तैपेई
हॉकी आशिया कप विजेता विश्वचषकासाठी ठरेल पात्र-
बिहारच्या राजगीर येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतील विजेता संघ 2026 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल. त्यानंतर अव्वल 5 संघ 2026 च्या विश्वचषक पात्रता फेरीत खेळतील.
क्रिकेटचा आशिया चषकही यूएईमध्ये-
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील अंतर आणखी वाढले आहे, इतर प्रत्येक क्षेत्राप्रमाणे त्याचा क्रीडा जगतावरही परिणाम झाला आहे. भारतीय क्रिकेट संघही अनेक स्पर्धांमध्ये पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेला नाही, त्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी झाला. आगामी क्रिकेटचा आशिया चषक देखील यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या,VIDEO:
संबंधित बातमी:
मुंबई इंडियन्स अन् आरसीबीकडून खेळलेल्या क्रिकेटपटूची अडल्ट साइटवर एन्ट्री, क्रिकेटविश्वात धुमाकूळ
