फिन्चच्या अवघ्या 76 चेंडूत 172 धावा, सामन्यात रेकॉर्ड्सचा पाऊस
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2018 08:53 PM (IST)
तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 229 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला अवघ्या 129 धावाच करता आल्या.
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या टी-ट्वेण्टी संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज अॅरॉन फिन्चने झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 76 चेंडूंत 172 धावा फटकावल्या. या खेळीसह टी- ट्वेण्टीतील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 229 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला अवघ्या 129 धावाच करता आल्या. सामन्यातील रेकॉर्ड्स या सामन्यात फिन्चसह ऑस्ट्रेलियन संघानेही अनेक रेकॉर्ड्स केले. फिन्चने वेगवान शतक झळकावतानाच टी-ट्वेण्टी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वैयक्तिक धावसंख्येचा आपलाच जुना रेकॉर्ड मोडला. 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 156 धावा केल्या होत्या. फिन्च आणि शॉर्टने 200 धावांची भागिदारी करत टी-ट्वेण्टीतील कोणत्याही विकेटसाठीच्या सर्वोच्च भागिदारीचा विश्वविक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेला 100 धावांनी लोळवत सर्वात मोठा सांघिक विजय साकारला.