FIFA World Cup 2022 Champion : फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2023) जिंकल्यानंतर प्रथमच अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ मैदानात उतरणार आहे. पनामा देशाविरुद्ध हा सामना अर्जेंटिना खेळणार असून गुरुवारी (23 मार्च) हा जगज्जेता संघ अर्जेंटिनाचीच राजधानी ब्युनोस आयर्सच्या (Buenos Aires) 'द मोन्युमेंटल स्टेडियम'मध्ये पनामाविरुद्ध आमनेसामने असणार आहे. या सामन्यासाठी अर्जेंटिनाच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
ब्युनोस आयर्सच्या मोन्युमेंटल स्टेडियममध्ये 83 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. त्यात 20 हजार तिकिटं आरक्षित होती आणि 63 हजार तिकिटं फुटबॉल चाहत्यांसाठी उपलब्ध होती, मात्र 63 हजार सिटांसाठी तब्बल 15 लाख लोकांनी तिकीट खरेदीसाठी अर्ज केला आहे. अर्जेंटिनामध्ये नेहमीच फुटबॉलची क्रेझ राहिली आहे. गेल्या वर्षी, अर्जेंटिना फिफा विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पावले टाकत असताना, येथे प्रत्येक सामन्यासोबतचा जल्लोष पाहण्यासारखा होता. फायनल जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या प्रत्येक शहरात लाखो लोक जल्लोष करताना दिसले. त्याच वेळी, अर्जेंटिना संघ ब्युनोस आयर्समध्ये विश्वचषक ट्रॉफीसह परेड काढत होता, तेव्हा या शहरातील रस्त्यावर 5 दशलक्ष लोक जमले होते.
तिकिटाचे दर 5 हजार ते 20 हजार होते
या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट 60 डॉलर (5 हजार रुपये) ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, सर्वात महाग तिकिटाची किंमत 245 डॉलर (20 हजार रुपये) ठेवण्यात आली होती. मीडिया इंडस्ट्रीशी संबंधित लोकही सामना पाहण्यासाठी इतके उत्सुक होते की 344 पत्रकारांच्या क्षमतेच्या मीडिया बॉक्ससाठी 1.30 लाख अर्ज आले.
लिओनेल मेस्सीही मैदानात दिसणार
अर्जेंटिनाच्या फुटबॉल चाहत्यांसाठी हा सामना खूप खास आहे. कारण जे लोक आपल्या संघाला कतारमध्ये चॅम्पियन होताना पाहू शकले नाहीत. त्यामुळेच चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी फार उत्सुकता आहे. या सामन्यात अर्जेंटिनाचे जवळपास तेच खेळाडू उतरवले जाऊ शकतात, जे फिफा विश्वचषक 2022 च्या संघाचा भाग होते. लिओनेल मेस्सीही हा सामना खेळताना दिसणार आहे.
रोमहर्षक होती फिफा विश्वचषकाची फायनल
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.
हे देखील वाचा-