नवी दिल्ली : दुखापतग्रस्त पॅट कमिन्सऐवजी ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात अँड्र्यू टायचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाच वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करणारा अँड्र्यू टाय नुकताच दुखापतीतून सावरला आहे. यंदाच्या आयपीएलदरम्यान त्याचा खांदा निखळला होता. त्या दुखापतीतून सावरल्यानंतर टाय पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
रांचीतून 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी टाय ऑस्ट्रेलियाच्या संघात सहभागी होईल. दुसरा आणि तिसरा ट्वेंटी ट्वेंटी सामना 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे गुवाहटी आणि हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल.