एक्स्प्लोर

Team India T 20 World Cup 2026: गंभीरच्या अंतर्गत राजकारणामुळे टीम इंडियाचा पराभव, सूर्याला धक्का मारल्यामुळे कुलदीप यादवला बाहेर ठेवलं? पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक आरोप

Team India T 20 World Cup : अहमद शहजादने कुलदीप यादवच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून अनुपस्थितीबद्दल एक खळबळजनक टिप्पणी केली आहे आणि म्हटले आहे की त्याला शिस्तभंगाच्या समस्येमुळे वगळण्यात आले असावे.

Ahmed Shehzad : भारताचा टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 मधील लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला होता. या पराभवानंतर भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेवर 107 धावांनी विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. तर, दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. यामुळं भारत उपांत्य फेरीत कशाप्रकारे पोहोचणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 76 धावांनी पराभव झाल्यानंतर, कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) अनुपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच वरुण चक्रवर्तीला रेअर ऑफ डे मिळाला, ज्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी घेतला आणि विजय निश्चित केला. त्यामुळे भारताकडे प्लॅन बीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अहमद शहजादने एक (Ahmed Shehzad) धक्कादायक दावा केला आहे. ज्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवसोबतच्या कथित मतभेदामुळे कुलदीपला वगळण्यात आल्याचा अंदाज त्याने वर्तवला आहे.

Ahmed Shehzad on Gautam Gambhir : गौतम गंभीरने भारतीय संघाच्या वातावरणात राजकारण आणलं

अहमद शहजादने कुलदीप यादवच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून अनुपस्थितीबद्दल एक खळबळजनक टिप्पणी केली आहे आणि म्हटले आहे की त्याला शिस्तभंगाच्या समस्येमुळे वगळण्यात आले असावे. 'हसना मन है' या कार्यक्रमात बोलताना शहजाद म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमारने कुलदीपला धक्का दिला. त्याने गौतम गंभीरवर टीका केली आणि आरोप केला की त्याने संघाच्या वातावरणात राजकारण आणले आहे. गंभीर सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. कुलदीपने आतापर्यंत स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी बेंचवर राहिल्यानंतर, कुलदीपने कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळला. त्याने त्याच्या तीन ओव्हरमध्ये फक्त 14 धावा देऊन एक विकेट घेतली. तर कुलदीपला नेदरलँड्सविरुद्ध बेंचवर ठेवण्यात आले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला संधी मिळाली नाही.


Ahmed Shehzad on Kuldeep Yadav: कुलदीप यादव सामना जिंकणारा खेळाडू

"पाकिस्तानच्या सामन्यानंतर अशी एक घटना घडली जिथे सूर्यकुमार यादवने त्याला धक्का दिला. लोक आता म्हणत आहेत की कदाचित कुलदीप यादवला शिस्तभंगाच्या समस्येमुळे किंवा सूर्यकुमार यादवच्या समस्येमुळे वगळण्यात आले असेल. अन्यथा, त्याला वगळण्यात आले नसते. कुलदीप यादव आपल्या फिरकीमध्ये विविधता आणतो आणि तो एक सामना जिंकणारा खेळाडू आहे," असेही शहजाद म्हणाला.

Ahmed Shehzad on Gautam Gambhir : गंभीरने राजकारणात प्रवेश केला आणि त्याची मानसिकता स्पष्टपणे बदलली

"जेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. गंभीरने राजकारणात प्रवेश केला आणि त्याची मानसिकता स्पष्टपणे बदलली. तो राजकारणात फारसा यशस्वी झाला नाही, परंतु असे दिसते की त्याने तेच राजकारण संघाच्या वातावरणात आणले आहे. गौतम गंभीरच्या या सर्व राजकारणामुळे भारतीय संघाची प्रतिमा खराब झाली आहे. संघातील संसाधनांचा योग्य वापर केला जात नाही - गौतम गंभीर त्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत नाही. तुमच्याकडे कुलदीप यादवसारखा सामना जिंकणारा खेळाडू आहे, पण तो योग्यरित्या हाताळला जात नाही," असे ते पुढे म्हणालाय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Prize Money Team India: टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
Sanju Samson T20 World Cup 2026: हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Team India Victory Parade In Mumbai: विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
Embed widget