मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. मात्र झहीर आणि सागरिकाला शुभेच्छा देताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा गोंधळ उडला.


साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना अनिल कुंबळे यांनी सागरिका घाटगेला टॅग करण्याऐवजी पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं. मात्र चुकी लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्वीट डिलीट केलं आणि दुसरं ट्वीट करुन अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केलं.



https://twitter.com/anilkumble1074/status/856545427360894976

तर आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरुनही संघाचा कर्णधार झहीर खानला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यांनीही चूक केली. हॅण्डलवर पत्रकार सागरिका घोष यांना ट्वीटमध्ये टॅग करुन शुभेच्छा दिल्या.

या ट्वीटनंतर अखेर सागरिका घोष यांनीही ट्वीट करुन दिल्ली डेअरडेव्हिल्सला त्यांच्या चुकीची जाणीव करुन दिली. त्यांनी लिहिलं की, "उप्स, चुकीची सागरिका सर, मी तर दोन मुलांची आई आहे."

https://twitter.com/sagarikaghose/status/856554755061108736