मुंबई : ब्रॅंडन मावुता आणि सिकंदर रजाच्या चमकदार कामगिरीच्या बळावर झिम्बाब्वेने पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशला 151 धावांनी पराभूत केले. त्यासोबतच मागील 5 वर्षातील पहिला कसोटी विजयही मिळवला.
पाकिस्तानला 2013 साली हरारेमध्ये पराभूत केल्यानंतर, झिम्बाब्वेचा हा पहिला कसोटीतला विजय आहे. तसेच मायदेशाबाहेरील कसोटीत 17 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने 17 वर्षापूर्वी चटगाव येथे बांग्लादेशला हरवले होते.
पदार्पणातील कसोटीत लेग स्पिनर मावुताने 21 धावा देत चार गडी बाद केले. तर ऑफ स्पिनर सिकंदर रजाने 41 धावा देत तीन गडी बाद केले. वेलिंग्टन मसाकाद्जानेही 2 गडी बाद केले
बांग्लादेशसमोर विजयासाठी 321 धावांचे लक्ष्य होते. मात्र चौथ्या दिवशी (मंगळवारी) बांग्लादेशचा संघ 169 धावावर तंबूत परतला. मसाकाद्जाने आरिफुल हकला (38) बाद करत बांग्लादेशच्या संघाचा दहावा बळी घेतला.
बांग्लादेशने विनाबाद 26 धावांपासून खेळायला सुरुवात केली होती, मात्र अर्ध्या तासानंतर थोड्या-थोड्या अंतराने गडी बाद होत गेले. रजाने लिटन दासला 23 धावावर पायचीत केले. त्यानंतर काइल जार्विसच्या चेंडूवर मोमिनुल हकपण बाद झाला. रजाने इमरूल कायेसला (43) तंबूत धाडले. वरच्या क्रमांकावर खेळायला आलेला कर्णधार महमूदुल्लाह 16 धावा करून बाद झाला. यानंतर एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.
'हरारे'विजयानंतर पाच वर्षांनी झिम्बाब्वेचं पुन्हा एकदा 'जिंकलोरे!'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2018 06:34 PM (IST)
पाकिस्तानला 2013 साली हरारेमध्ये पराभूत केल्यानंतर, झिम्बाब्वेचा हा पहिला कसोटीतला विजय आहे. तसेच मायदेशाबाहेरील कसोटीत 17 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने 17 वर्षापूर्वी चटगाव येथे बांग्लादेशला हरवले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -