टी-20मध्ये एबी डिव्हिलियर्सची तुफानी फलंदाजी, 19 चेंडूत 50 धावा
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 04:07 PM (IST)
टायटन्सकडून खेळताना डिव्हिलियर्सनं या धडाकेबाज खेळीत पाच षटकार आणि तीन चौकारही ठोकले.
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं आफ्रिकेतील रॅम स्लॅम टी-20 स्पर्धेत अवघ्या 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या आहेत. टायटन्सकडून खेळताना डिव्हिलियर्सनं या धडाकेबाज खेळीत पाच षटकार आणि तीन चौकारही ठोकले. लॉयन्स आणि टायटन्समधील सामन्यात लॉयन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लॉयन्सनं 6 गडी 127 धावा केलेल्या असताना पावसानं हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार टायटन्सला विजयासाठी 135 धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना टायटन्सला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. हेन्री डेनिस 5 धावांवर बाद झाला. तर डिकॉकही 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या डिव्हिलियर्सनं तुफानी फलंदाजी करत अवघ्या 12 षटकातच संघाला सामना जिंकून दिला.