Champions Trophy : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याबाबतचा निर्णय आज घेतला जाऊ शकतो. यासाठी दुबईत आयसीसीच्या सर्व बोर्ड सदस्यांसोबत बैठक सुरू आहे. पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाची संधी मिळाल्यानंतर भारताने सुरक्षेचे कारण देत तेथे जाण्यास नकार दिला होता. तेव्हा आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही हायब्रीड मॉडेलवर होणार असल्याचे मानले जात होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यापूर्वी सर्व भारतीय सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा आणि सामन्यानंतर खेळाडूंना भारतात पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जेव्हा भारताने हे मान्य केले नाही तेव्हा पाकिस्तानने हायब्रिड मॉडेललाही नकार दिला.


आयसीसी मीटिंगमध्ये हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव देऊ शकते, जर पीसीबीने ते स्वीकारले नाही तर ते होस्टिंगचे अधिकार गमावू शकतात. पाकिस्तानात जाऊन खेळण्यासाठी भारतावर दबाव आणण्याची शक्यता कमी आहे. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत भारतात जाणार नाही. बीसीसीआयला सरकारकडून पाकिस्तानला न जाण्याचे आदेश मिळाले आहेत. शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. आयसीसीला भारताशिवाय ही स्पर्धा खेळायची असेल तर संघ त्यासाठीही तयार आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.  


तर भारत ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहे


भारत सरकारने तर बीसीसीआयला सांगितले आहे की जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद नाकारले तर ते भारतच आयोजित करेल. आयसीसीने भारताला यजमानपदाचे अधिकार दिल्यास सरकारकडून त्याला पूर्ण पाठिंबा मिळेल. एवढेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात येणाऱ्या संघांच्या खेळाडूंना व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.


पीसीबी हायब्रीड मॉडेलला कधीही सहमती देणार नाही


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले की, स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करणे मी कधीही स्वीकारणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भूमिका अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तान क्रिकेटसाठी जे काही चांगले असेल ते आम्ही करू. आम्ही भारतात खेळायला जातो आणि ते इथे खेळत नाहीत हे पूर्णपणे योग्य नाही. जोपर्यंत भारत आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार देत आहे, तोपर्यंत पाकिस्तानचा संघही भारतात जाणार नाही. आम्ही आयसीसीला सांगितले आहे की, जो निर्णय घ्यायचा तो समानतेच्या आधारावर व्हायला हवा.


जय शाह आयसीसीबद्दल विचार करतील


नक्वी यांनी गेल्या गुरुवारी सांगितले की, जय शाह डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. मला आशा आहे की आयसीसीमध्ये पोहोचल्यानंतर ते आयसीसीबद्दल विचार करतील. अशा पदावर कोणी पोहोचल्यावर त्यांनी समितीच्या हिताचाच विचार करावा. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी करत आहे. पीसीबीने तिन्ही स्टेडियमचे काम जवळपास पूर्ण केले आहे. त्यांनी लाहोर, कराची आणि रावळपिंडी स्टेडियमच्या नूतनीकरणावर 12.5 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, भारत सरकारने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास आधीच नकार दिला होता. बीसीसीआयने आयसीसीला सांगितले होते की, संघ पाकिस्तानमध्ये स्पर्धा खेळणार नाही. जर पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला सहमती दिली नाही, तर ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवली जाऊ शकते.


इतर महत्वाच्या बातम्या