नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राला उत्तेजकांचा किती मोठा विळखा पडला आहे, याची कल्पना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी संसेदत दिलेल्या उत्तरातून आली. गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल 379 भारतीय क्रीडापटू उत्तेजक सेवनात दोषी आढळल्याची माहिती गोयल यांनी संसदेला दिली आहे.


नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे 'नाडा'ने दिलेल्या माहितीच्या आधारे गोयल यांनी हे लेखी उत्तर दिलं. 2013 साली 96, 2014 साली 95, 2015 साली 120 आणि 2016 साली 68 भारतीय क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत.

डोपिंग ही क्रीडाक्षेत्रासाठी घातक समस्या सजमली जाते. मात्र भारतीय क्रीडा क्षेत्राला त्याचा चांगलाच विळखा पडला आहे. काही दिवसांपूर्वीच पैलवान नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकपूर्वी डोपिंगमध्ये दोषी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याला ऑलिम्पिकलाही मुकावं लागलं.