कोकणातील अनेक भागात आज अवकाळी पाऊस झालाय. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये तुफान पाऊस झाला..बाजारपेठ परिसरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले होते. वारा आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसानं लोकांची तारांबळ उडाली..तर तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे आंबा पिकही धोक्यात आलंय. दुसरीकडे रायगडच्या दक्षिण भागातली पाऊस झालाय. माणगाव, श्रीवर्धन, रोह्यासह इतर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर सिंधुदुर्गातील कुडाळ, सावंतवाडी, कणकवली तालुक्यालाही अवकाळी पावसानं झोडपलंय. विजांच्या कडकाडाटासह झालेल्या पावसामुळे पिकांना धोका आहे.