मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या (Kalyan) जागेवरून महायुतीत (Mahayuti) धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekbath Shinde) यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता भाजपचे कल्याणचे स्थानिक नेतृत्व काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.