Ritu Tawade News Mumbai Mayor : भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर, साटम यांनी केली नावाची घोषणा राज्यभरातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित १२ जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता.