एका गुजराती कंपनीची गिरगाव इथल्या कार्यालयासाठी नोकरभरतीची जाहिरात व्हायरल झाली होती, ज्यात मराठी लोकांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, असं सांगण्यात आलं होतं. मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारल्याने नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणेंनी देखील परखड शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी 'not welcome' म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका, असं रेणुका शहाणे म्हणाल्या.