दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना देण्यात आला होता. शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या केल्यात. कुणकेश्वर मंदिर परिसरात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आलीय. कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर १०७ शिवलिंग आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंग दृष्टीस पडतात.