जर तुम्हाला तुमच्या म्हातारपणाची चिंता असेल, तर केंद्र सरकारने एक मोठी गूड न्यूज दिलीये. 'अटल पेन्शन योजना' आता 2031 पर्यंत वाढवण्यात आली आहे! या योजनेअंतर्गत, तुम्ही वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन मिळवू शकता. ही योजना काय आहे, आणि पेन्शन कशी मिळणार जाणून घेऊयात...या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं? तर 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतो. लक्षात ठेवा, पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.तुम्हाला किती पेन्शन हवी, यावर तुमचा हप्ता ठरेल.जर तुम्ही 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली, तर 5000 पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा फक्त 210 भरावे लागतील.पण जर तुम्ही 40 व्या वर्षी सुरुवात केली, तर त्याच 5000 पेन्शनसाठी दरमहा 1454 भरावे लागतील.---जर तुम्ही 42 रुपये जमा केले तर तुम्हाला 60 वर्षांच्या वयानंतर दरमहा 1000 पेन्शन मिळेल.जर तुम्ही 84 जमा केले तर तुम्हाला 2000 पेन्शन मिळेल.जर तुम्ही 126 जमा केले तर तुम्हाला 3000 पेन्शन मिळेल.जर तुम्ही 168 जमा केले तर तुम्हाला 4000 पेन्शन मिळेल.जर तुम्ही 210 जमा केले तर तुम्हाला 5000 पेन्शन मिळेल.म्हणूनच, जितक्या लवकर सुरुवात कराल, तितका जास्त फायदा होईल! सुरक्षित भविष्यासाठी आजच जवळच्या बँकेत जाऊन 'अटल पेन्शन योजने'साठी अर्ज करा.