झहीर खान-सागरिका घाटगे अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावेळी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली.
दरम्यान, झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं.
झहीर खान आणि सागरिका यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर त्यांनी काल कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला.
झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह केला.
नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.
टीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -