धोनीच्या सिनेमात युवराज सिंहची खास चर्चा!
धोनीची अंडर 19च्या विश्वचषक संघासाठी त्यावेळी निवड करण्यात आली नाही. तेव्हा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखील संघानं अंडर 19चा विश्वचषक पटकावला. त्यावेळी देखील युवराज सिंह त्या विश्वचषकातील स्टार खेळाडू होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावेळी धोनी त्यांना सांगतो की, एका खेळाडूनं संपूर्ण सामना बदलून टाकला. संपूर्ण बिहार संघाच्या 357 धावांपेक्षा अधिक धावा त्याने केल्या. त्याच्या या त्रिशतकामुळे पंजाब संघानं पाच विकेटच्या मोबदल्यात 839 धावा केल्या.
यानंतर धोनीनं 14 चौकार आणि 2 षटकार ठोकून 84 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. सिनेमात धोनीच्या मित्रांना जाणून घ्यायचं असतं की, त्या सामन्यात नेमकं काय झालं.
धोनीच्या करिअरशी निगडीत हा सामना महत्वाचा होता असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. धोनी जेव्हा फलंदाजीसाठी उतरला त्यावेळी त्यांचा संघ 159 धावा आणि 5 गडी बाद अशी अवस्था होती.
तो खेळाडू होता युवराज सिंह. अंडर 19 विश्वचषकाआधी धोनी आणि युवराज आमनेसामने आले होते. 1999 साली कूच बिहार ट्रॉफीचा अंतिम सामना झाला होता. हा सामना पंजाब आणि बिहार या दोन संघामध्ये होता.
सिनेमात धोनी आपल्या मित्रांना एका खेळाडूविषयी सांगतो. जो की, त्यांच्या बिहार संघापेक्षा जास्त धावा करतो. ज्यामुळे धोनीच्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची संधीच मिळत नाही.
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर तयार करण्यात आलेला बायोपिक 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातून धोनीबाबत अनेक माहित नसलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. अशीच एक युवराज आणि धोनीविषयी महत्वाची गोष्ट या सिनेमातून आता समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -