Yuvraj Singh | युवराज सिंगच्या वनडे क्रिकेटमधील अविस्मरणीय खेळी
भारताचा सिक्सर किंग 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावुक झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुवराज सिंगची मोहम्मद कैफच्या साथीने 2002 मध्ये इंग्लंडमध्ये नेटवेस्ट सीरिजमधील 63 चेंडूत 69 धावांची खेळी कुणीही विसरणार नाही.
युवराजने मोहम्मद कैफसोबत 121 धावांची भागिदारी रचत इंग्लंडने दिलेले 325 धावांचं कठीण लक्ष्य पार केलं होतं.
युवराजचा सलग सहा षटकारांचा विश्वविक्रम आजही कुणी मोडू शकलं नाही.
या सामन्यातील विजयानंतर कर्णधार सौरभ गांगुली आपलं टी-शर्ट काढून फिरवून आनंद साजरा केला होता.
या कामगिरीमुळे युवराजला 2011 विश्वचषकात 'मॅन ऑफ द सीरिज'चा मान मिळाला होता.
2011 विश्वचषकात युवराजने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करत 362 धावा आणि 15 विकेट घेतल्या होत्या.
भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देणं युवराजचं स्पप्न होतं आणि ते 2011 मध्ये त्याने पूर्णही केलं.
2007 टी-20 विश्वचषकातील विजयातही युवराजची महत्त्वाची भूमिका होती.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर लगावलेले सलग सहा षटकार तर आजची सगळ्यांच्या लक्षात आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -