चॅम्पियन्स ट्रॉफी : तापामुळे युवराजला सराव सामन्यातून विश्रांती
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2017 07:21 PM (IST)
1
सराव सामन्यांनंतर भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 4 जूनला होणार आहे. या सामन्यापूर्वी युवराज प्रकृती ठिक होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
2
युवराज सिंहला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात खेळणार नसल्याचं बीसीसीआयने सांगितलं.
3
सराव सामन्याच्या पार्श्वभूमीवर मेडीकल टीमने युवराजची शनिवारी तपासणी केली. त्याची प्रकृती सध्या सुधरत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
4
ताप आल्यामुळे युवराजला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयने दिलं आहे.
5
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर पहिल्याच सराव सामन्यात अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहला खेळता आलं नाही.