भारतीय संघात संधी न मिळाल्यामुळे युसूफ पठाण बांगलादेशात
एवढंच नव्हे तर युसूफ पठाणसोबत इतर भारतीय खेळाडूंनीही डीपीएलचा मार्ग निवडला आहे. कोलकात्याचा मनोज तिवारी आणि पंजाबचा उदय पॉल यांनाही अबहानी लिमिटेड संघाने करारबद्ध केलं आहे.
या आयपीएल मोसमात सरासरीनुसार धावा बनवण्यात विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. तर युसूफ 72.20 च्या सरासरीने धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.
युसूफने या आयपीएल मोसमात 72.20 च्या सरासरीने 361 धावा केल्या आहेत. ज्याच्या बळावर कोलकाता संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीत कोलकात्याला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर खेळाडू युसूफ पठाण या आयपीएल मोसमातील दुसरा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. तरीही त्याला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळं त्याने डीपीएलचा पर्याय निवडला आहे.
आयपीएल 2016 मध्ये दमदार कामगिरी करुनही युसूफ पठाणची आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता युसूफ पठाण बांगलादेशातील ढाका प्रीमिअर लीगमध्ये (डीपीएल) खेळणार आहे. ढाका प्रीमिअर लीगसाठी युसूफ पठाणला अबहानी लिमिटेड या संघाने करारबद्ध केलं आहे.