या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार
15 डिसेंबरपर्यंत पाणी आणि विज बिलासाठी पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील.
आजपासून जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत. या नोटा बँकेत तुमच्या खात्यात भरुन तुम्ही एटीएम, बँक स्लीप किंवा चेकद्वारे काढू शकाल. केंद्र सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
प्री पेड मोबाईल रिचार्जसाठीही जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील.
महापालिका, सरकारी शाळांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतच्या फीसाठी जुन्या पाचशेच्या नोटा चालतील. त्यासाठी अधिकच्या रकमेसाठी चेकचा वापर करावा.
रुग्णालयांमध्ये 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील
रुग्णालयाच्या परिसरातील खाजगी दुकानांवर 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील.
पेट्रोल पंपावर 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील
जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली असली तरी हजारच्या नोटा या ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. हजारच्या नोटा फक्त बँकेतच जमा कराव्या लागतील.