योगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय
1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कट्टर हिंदुत्ववादी अशी आजवर आदित्यनाथ यांची ओळख आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणासोबत भाजप या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
योगी आदित्यनाथ हे आज चार्टर्ड विमानं दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर भाजपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरु होते. अखेर आज योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सुरुवातीला मनोज सिन्हा, केशव मौर्य यांचं नाव आघाडीवर होतं. पण या दोघांना मागे टाकत योगी आदित्यनाथ यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.
दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची आज लखनऊमध्ये बैठक झाली. त्यामध्ये त्यांच्या नावार एकमत झालं. उद्या (19 मार्च) योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -