Year Ender 2017 : या वर्षातील बेस्ट बजेट कॅमेरा स्मार्टफोन

2017 या वर्षात ड्युअल कॅमेरा फोनची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. कमी किंमत आणि चांगला कॅमेरा असलेल्या फोनला ग्राहकांनी पसंती दिली. या वर्षात भारतीय बाजारात असे काही फोन आले, ज्यांची किंमत 20 हजार रुपयांच्या आत होती, मात्र फीचर्स चांगले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Honor 7X (12 हजार 999 रुपये) : या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेंसर 16 आणि डेप्थ सेंसर 2 मेगापिक्सेलचा आहे. तर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Gionee S10 Lite(15 हजार 999 रुपये ) : यामध्ये 13 मेगापिक्सेल रिअर आणि 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Huawei Honor 8 (17 हजार 599 रुपये) : 12MP+12MP चा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Honor 9i (17 हजार 999 रुपये) : या फोनचा ड्युअल कॅमेरा लोकप्रिय आहे. यामध्ये 13 मेगापिक्सेलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
Xiaomi MiA1 (13 हजार 999 रुपये) : या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे, तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Moto G5S Plus (14 हजार 999 रुपये ) : ड्युअल कॅमेरा सेटअप ही या फोनची विशेषता आहे. यामध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Oppo F3 (16 हजार 990 रुपये ) : या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यापैकी एक लेंस 16, तर दुसरी 8 मेगापिक्सेलची आहे. शिवाय 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo V7 (16 हजार 990 रुपये) : बेस्ट कॅमेऱ्यासाठी हा फोन ओळखला जातो. यामध्ये 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे, तर 24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -