YearEnder 2017 : कुणीही 'सुपरस्टार' नाही, तरीही 'या 5 सिनेमांचा दबदबा!
ट्रॅप्ड... राजकुमार रावचाच सिनेमा असलेल्या 'ट्रॅप्ड'चीही चर्चा झाली. एका मल्टीस्टोरी बिल्डिंगमध्ये 35 व्या मजल्यावर राजकुमार राव अडकतो, मग तिथून निघण्याची त्याची धडपड, मग अडचणी इत्यादी गोष्टी या सिनेमात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिक्रेट सुपरस्टार... 'दंगल गर्ल' झायरा वसिम हिची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. केवळ 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने 60 कोटींची कमाई केली.
सचिन : अ बिलियन ड्रीम्स... मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरील या डॉक्युमेंट्रीलाही प्रेक्षकांनी पसंती दिली. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांनीही सचिनवरील प्रेमाखातर ही डॉक्युमेंट्री पाहिली. 80.57 कोटींचा गल्ला या डॉक्युमेंट्रीने बॉक्स ऑफिसवर जमवला.
न्यूटन... नक्षलग्रस्त भागातील मतदान प्रक्रियेतील अडथळे, तिथल्या निवडणूक कर्मचाऱ्याचा संघर्ष अशा एकंदरीत विषयावर आधारित हा सिनेमा यंदा ऑस्करसाठीही भारताकडून गेला होता. अभिनेता राजकुमार रावची यात प्रमुख भूमिका आहे.
गाझी अटॅक... भारत-पाकमधील अशा एका युद्धाची कहाणी यातून पडद्यावर आणण्यात आली आहे, जे युद्ध पाण्यात लढलं गेलं. समुद्रात 300 मीटर खोल जाऊन भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा मुकाबला केला. यावर आधारित हा सिनेमा आहे.
2017 वर्ष संपत आलं आहे. सिनेक्षेत्रासाठी हे वर्ष अत्यंत स्पेशल ठरलं. अनेक नव्या धाटणीचे सिनेमे या वर्षी प्रदर्शित झाले. यावर्षी असेही अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आणि सुपरहिट ठरले, ज्यांमध्ये कुणीही नावाजलेला सुपरस्टार नव्हता. मात्र हे सिनेमे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ठरले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -