शाओमीचा नवा सेल, स्मार्टफोनवर घसघशीत सूट

याचसोबत शाओमीचा एअर प्युरीफायर -2 वर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. 9,999 रुपये किंमतीचा हा प्युरीफायर 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर एअर प्युरीफायर बंडल 9,998 रुपयात खरेदी करता येईल. ज्याची किंमत 12,498 रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
याशिवाय कंपनीनं इतरही गॅझेट्सवर भरघोस सूट दिली आहे. mi राऊटवर 3C हा या सेलमध्ये 899 रुपयांना उपलब्ध आहे. याची किंमत 1,199 रुपये होती. तर इन-इअर हेडफोन प्रो एचडी हे 599 रुपयात खरेदी करता येणार आहेत.

या सेलमध्ये शाओमी रेडमी नोट 4 (4जीबी + 64 जीबी) हा स्मार्टफोन 10,999 रुपयात उपलब्ध आहे. याची किंमत 12,999 रुपये आहे. तर mi Max 2च्या किंमतीतही दोन हजारांची सूट देण्यात आली आहे.
या सेलमध्ये दररोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता 1 रुपयांचा फ्लॅश सेल इव्हेंट होणार आहे. ज्यामध्ये यूजर्स फक्त 1 रुपयात शाओमीचे प्रोडक्ट खरेदी करु शकतात.
चीनी कंपनी शाओमीनं दिवाळीसाठी आजपासून (27 सप्टेंबर) सेल सुरु केला आहे. कंपनीनं आपल्या mi.com या अधिकृत वेबसाइटवर हा सेल सुरु केला आहे. हा सेल 29 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. यामध्ये शाओमीच्या स्मार्टफोन्ससह इतरही अनेक गॅझेटवर अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -