शाओमीचा आणखी एक धमाका, 9000 रु. Redmi 3X लाँच
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 08:33 PM (IST)
1
यामध्ये 4जी, जीपीआरएस, ब्ल्यूटूथ हे फीचर्सही आहेत. तसेच 4100 mAh क्षमतेची बॅटरीही देण्यात आली आहे.
2
यामध्ये रिअर पॅनल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आहा. तसेच 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
3
यामध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे.
4
या स्मार्टफोनमध्ये 5 इंच एचडी डिस्प्ले आहे. ज्याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपनड्रॅगन 430 प्रोसेसर आहे.
5
स्मार्टफोन रेडमी 3Xमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी आहे. या फोनचे बरेचसे फीचर्स हे रेडमी 3s आहे.
6
नुकतंच रेडमी 3s लाँच केल्यानंतर शाओमीनं आपला नवा फ्लॅगशिप रेडमी 3x चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 899 युआन (जवळजवळ 9000 रु.) आहे.