शाओमीच्या पहिल्या अँड्रॉईड वन फोनच्या किंमतीत कपात
Mi A1 चा कॅमेरा ही या फोनची सर्वात मोठी विशेषता आहे. कारण ड्युअल कॅमेरा असणारा हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे. यामध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोनमध्ये 625 स्नॅपड्रॅगन क्वालकॉम प्रोसेसर आणि 4GB रॅम आहे. तर 64GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. 128GB पर्यंत हे स्टोरेज वाढवलं जाऊ शकतं. सोबतच 3080mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे.
शाओमीचा हा पहिल्या नव्या अँड्रॉईड सिस्टमचा फोन आहे, ज्यामध्ये अँड्रॉईड ओ आणि अँड्रॉईड पी पर्यंत अपडेट मिळणार आहे. अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस सिस्टमवर चालणाऱ्या या ड्युअल कॅमेरा फोनमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन 12 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होता. मात्र ही सेल प्राईस होती. पण आता फोनच्या मूळ किंमतीत कायमस्वरुपी कपात करण्यात आल्याने हा फोन एक हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
शाओमीचा पहिला अँड्रॉईड वन स्मार्टफोन Mi A1 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. मूळ किंमतीत एक हजार रुपयांची कपात झाल्यामुळे हा फोन आता 13 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 14 हजार 999 रुपये होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -