पैलवान नरसिंह यादव बोहल्यावर
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2017 11:02 PM (IST)
1
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनेही नरसिंह यादवच्या लग्नाला हजेरी लावली.
2
दरम्यान दोन आठवड्यांपूर्वीच नरसिंह यादवला महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक पदावर नोकरीही देण्यात आली आहे.
3
पण शिल्पीने कुटुंबियांची परवानगी घेऊनच नरसिंह यादवला होकार कळवला. अखेर ते दोघं आज विवाहबद्ध झाले.
4
शिल्पीच्या सरावातला प्रामाणिकपणा पाहून त्याचं तिच्यावर प्रेम जडलं. नरसिंहने त्याच शिबिरात शिल्पीला प्रपोज केलं होतं.
5
2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकच्या सराव शिबिरात नरसिंहने शिल्पीला पहिल्यांदा पाहिलं.
6
नरसिंग आणि शिल्पीचा विवाहसोहळा मुंबईनजिकच्या मीरा-भाईंदर परिसरात संपन्न झाला.
7
महाराष्ट्राचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंग यादव आज हरयाणाच्या सॅफ गेम्स सुवर्णपदकविजेत्या पैलवान शिल्पी शिवरानसोबत विवाहबंधनात अडकला.