'टॉयलेट एक प्रेम कथा'ची वर्ल्डवाईड कमाई 200 कोटींच्या घरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून हा सिनेमा प्रेरित असल्याचं बोललं जातं. ज्यामध्ये शौचालयाची समस्या मांडण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील एका गावाची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका अहवालानुसार 8-9 महिन्यांपूर्वी उघड्यावर शौचाला बसण्याचं प्रमाण 54 टक्के होतं, मात्र आता हा आकडा 34 टक्के झाला आहे, अशी माहितीही अक्षय कुमारने दिली. मनोरंजनाच्या माध्यमातून मी मेसेज देण्याचा प्रयत्न केला, असं अक्षय कुमार म्हणाला.
हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर काम करतच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून उघड्यावर शौचाला बसण्याची जी परंपरा होती, ती मोडीत निघण्यासही मदत होत असल्याचं अक्षय कुमार म्हणाला.
टॉयलेट एक प्रेम कथाच्या यशानंतर अक्षय कुमारही खुश आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही माहित नव्हतं, मात्र शौचालयाची समस्या घरा-घरात समजावून सांगणं हे ध्येय होतं, असं अक्षय कुमारने एका व्हिडिओ मेसेजद्वारे म्हटलं आहे.
‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि परदेशात 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.या सिनेमाच्या कमाईचा वेग अजूनही कायम आहे. कारण बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक या सिनेमासाठी अजूनही गर्दी करत आहेत.
टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.
Bollywoodhungama.com च्या आकडेवारीनुसार या सिनेमाने परदेशात आतापर्यंत 24.32 कोटी रुपये कमाई केली आहे. या सिनेमाची भारतातील ग्रॉस कमाई आणि ओव्हरसीज कमाई मिळून 184.11 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे टॉयलेट एक प्रेम कथाने वर्ल्डवाईड 184 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
या सिनेमाने भारतात 159.79 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमा भारतात दमदार कमाई केली आहे. भारतासोबतच या सिनेमाने परदेशातील बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -