सुलतानची वर्ल्डवाइड 450 कोटींची कमाई, अनेक विक्रम मोडीत!
सुलतानः 191 कोटी
2016 सालामध्ये 100 कोटीची कमाई करणारा हा तिसरा सिनेमा ठरला आहे.
यावर्षी तीन दिवसामध्ये 100 कोटीची कमाई करणारा सुलतान पहिलाच सिनेमा ठरला आहे.
सुलतान सिनेमानं पहिल्या तीन दिवसातच 105 कोटीची कमाई केली आहे.
सलमानचं आजवर दोन सिनेमे बुधवारी प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी सुलतान आणि दुसरा एक था टायगर. यामध्ये सुलतानने बाजी मारली आहे.
सलमाननं आपल्या स्वत:च्या सिनेमाचेही विक्रम मोडीत काढले आहेत.
खेळ किंवा त्यासंबधी तयार होणाऱ्या सिनेमामध्ये देखील सुलताननं बाजी मारली आहे. त्याआधी भाग मिल्खा भागने पहिल्या दिवशी 9 कोटी आणि मेरी कोमने 8.4 कोटीची कमाई केली आहे.
सुलताननं प्रदर्शनांपूर्वीच एक रेकॉर्ड रचला होता. सिनेमा प्रदर्शनापूर्वीच या सिनेमान अॅडव्हांस बुकींगमधून 20 कोटी कमावले होते.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमामध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'सुलतान' हा सिनेमा ठरला आहे.
पहिल्याच दिवशी 36 कोटींची कमाई करुन या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. याआधील शाहरुखच्या 'फॅन' सिनेमानं 19 कोटीची कमाई केली होती.
200 कोटींची कमाई करणारा सलमान खानचा हा तिसरा सिनेमा आहे.
सुलताननं अवघ्या 7 दिवसात 200 कोटींची कमाई केली आहे.
जगभरातून सुलताननं 450 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. वर्ल्डवाइड 450 कोटीच्या कमाईमध्ये सुलतान टॉप 5 सिनेमांच्या यादीत 4थ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर धूम 3 सिनेमा असून त्याने 542 कोटींची कमाई केली आहे. तर बजरंगी भाईजाननं 626 कोटीची कमाई केली होती. तर पीके हा क्रमांक 1 वर आहे. त्याने तब्बल 792 कोटीची कमाई केली होती.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'सुलतान' सिनेमा नवनवे रेकॉर्ड रचत आहेत. 11 दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 250 कोटीची कमाई केली आहे. पाहा जगभरातून सुलताननं किती कमाई केली आहे.