जगातील सर्वात मोठं प्लॅस्टिक बॉल मोझॅक

मुंबईतील कलाकार चेतन राऊत यांनी बालदिनाच्या निमित्ताने अनोखा विक्रम केला आहे. चेतन राऊत यांनी जगातील सर्वात मोठं प्लॅस्टिक बॉल मोझॅक तयार केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या पोर्ट्रेटमध्ये एका आदिवासी मुलाचं चित्र साकारलं असून बालदिन म्हणजेच 14 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी त्याला हे भेट दिलं जाणार आहे.

13 नोव्हेंबरला 100 आदिवासी मुलांना वारली कलेचे प्रात्यक्षिक दाखवून बालदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
हे मोझेक पोर्ट्रेट मुंबईत आरे कॉलनीतल्या मरोशी पाडा येथे साकारण्यात आलं आहे. हे मोझेक पोर्ट्रेट 13 तारखेपासून सर्वांसाठी खुलं ठेवण्यात येत आहे.
या मोझॅक आर्टमध्ये प्लॅस्टिकच्या सहा हजार चेंडूंचा वापर करण्यात आला आहे. आठ फूट रुंद आणि आठ फूट लांब असं हे भव्य पोर्ट्रेट आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -