जागतिक मल्लखांब स्पर्धेला मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2019 02:45 PM (IST)
1
पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात 88 वर्षांच्या शांतिलाल संघवी यांनी आपलं कौशल्य सादर केलं. त्यांनी वयाच्या ८२व्या वर्षी मल्लखांबाची बाराखडी गिरवायला सुरुवात केली.
2
3
4
5
मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कमधल्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या प्रांगणात आज शनिवार आणि उद्या रविवारी स्पर्धा संपन्न होईल.
6
पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत सहभागी झालेल्या 14 देशांमधल्या खेळाडूंच्या वतीनं भारतीय संघांचे कर्णधार हिमानी परब आणि सागर ओव्हाळकर यांनी शपथ घेतली.
7
पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेचं मोठ्या उत्साहात उद्घाटन झालं आहे. भारतासह १४ देशांचा या स्पर्धेत सहभाग आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.