वुमन्स कबड्डी चॅलेन्ज : फायरबर्ड्सनी आईस डिवाजला पाणी पाजलं
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 03:07 PM (IST)
1
आयोजकांनी महिलांचे कबड्डी सामने सुरु केल्याने महिला खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
2
तर आईस डिवाजसाठी खुशबू नरवाल आणि सोनाली शिंगाटेने प्रत्येकी चार गुणांची कमाई केली.
3
फायरबर्डकडून ममता पुजारी आणि पायल चौधरीने प्रत्येकी पाच गुणांची वसुली केली.
4
मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात फायरबर्डस संघानं अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं.
5
सलामीच्या सामन्यात ममता पुजारीच्या फायरबर्डसने अभिलाषा म्हात्रेच्या आईस डिवाजचा 25-12 असा धुव्वा उडवला.
6
प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर वुमेन्स कबड्डी चॅलेन्जचा नारळ फुटला.