हाजी अली दर्गा: हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, महिला प्रवेशावरील बंदी उठवली
आता हायकोर्टाने ही बंदी उठवत, महिलांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात होती.
याआधी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल हायकोर्टानं दिला आहे.
पुरुषांप्रमाणं महिलांनाही हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी होती.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.
जिथं पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाची बंदी उठवली. हायकोर्टाने आज हा ऐतिहासिक निर्णय दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -