✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

... तरच पुढे क्रिकेट खेळणार : विराट कोहली

एबीपी माझा वेब टीम   |  09 Sep 2017 11:01 AM (IST)
1

तरुण खेळांकडे आकर्षित झाले तर आपल्याकडे खेळाडूंची संख्या वाढेल, ज्यामुळे मोठी मदत होईल, अंसही विराट म्हणाला.

2

आमच्या काळात गॅजेट्स नव्हते. आजकाल लोक आयफोन किंवा आयपॅडवर व्यस्त असतात. आमच्या वेळी कुणाकडे व्हिडिओ गेम असेल तर सर्व जण त्याच्याकडे जाऊन तो गेम खेळण्याचा प्लॅन करायचो. मी माझं बालपण रस्ते आणि मैदानांवर विविध खेळ खेळून काढलंय. त्यामुळे तरुणांनी घराबाहेर पडावं आणि कोणत्या ना कोणत्या खेळात प्राविण्य मिळवावं, असं आवाहन विराटने तरुणांना केलं.

3

चांगली कामगिरी करण्याची माझी भूक कधीही संपत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मी अशीच मेहनत करत राहिलो तर माझ्यात आठ ते दहा वर्षांचा खेळ बाकी आहे. मी दररोज नव्या गोष्टींची सुरुवात करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींचंही माझ्यासाठी तेवढंच महत्त्व आहे, असंही विराट म्हणाला.

4

चांगली कामगिरी करण्यामागे काहीही रहस्य नाही. अनेकांना तर हे देखील माहिती नाही की आम्ही किती मेहनत करतो. थकलेलं असतानाही 70 टक्के ट्रेनिंग पूर्ण करुन एखादा खेळाडू मध्येच आराम करतो, असं मी अजून पाहिलेलं नाही. आम्ही काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावतो, असं विराटने एका कार्यक्रमात सांगितलं.

5

विराटने गेल्या काही दिवसात अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. तर आणखी मोठ्या विक्रमांच्या तो जवळ आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग दोन शतकं ठोकून तो सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. वन डेतील 30 शतकं पूर्ण करत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली.

6

आपल्यात अजून आठ ते दहा वर्षांचं क्रिकेट बाकी असल्याचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे. फिटनेस आणि ट्रेनिंग अशीच कायम राहिली तर आपण आणखी दहा वर्षे क्रिकेट खेळू असं विराटने सांगितलं.

7

यासोबतच विराट कोहली शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरनंतर वन डेत सर्वाधिक शतकं ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिनच्या नावावर वन डेत 49 शतकं आहेत. विराटने या वर्षात सहा शतकं आणि सात अर्धशतकं पूर्ण करत 1639 धावा केल्या आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ... तरच पुढे क्रिकेट खेळणार : विराट कोहली
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.