बर्थ डे स्पेशल : म्हणून टीम इंडियाच्या विजयानंतर धोनी स्टम्प काढून नेतो
रांचीचा धोनी आज जगभरात सुप्रसिद्ध झाला. मात्र कृष्ण सुदाम्याला विसरला नाही, तसाच धोनी कुलबिंदरला विसरला नसल्याचं म्हटलं जातं.
धोनी जरी हे कारण पुढे करत असला, तरी त्यामागे आणखी एक गुपित असल्याचं म्हटलं जातं. याला कारणीभूत आहे माहीचा बालमित्र कुलबिंदर. एका नेपाळी वॉचमनचा मुलगा कुलबिंदर हा धोनीचा शालेय वयातला बेस्ट फ्रेण्ड. त्याने धोनीचे गुण हेरले आणि क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
‘माझ्या पोस्ट रिटायरमेंट प्लानसाठी मी या स्टम्प काढून नेतो. मी स्टम्प्स घरी घेऊन जातो. पुढे जेव्हा मी एखादी स्टम्प पाहीन, तेव्हा ही स्टम्प त्या मॅचमधली होती, हे माझ्या लक्षात येईल.’ असं धोनी सांगतो.
कुलबिंदरने आता स्वतःचं एक छोटंसं घर बांधलं आहे. मात्र धोनीच्या या बालमित्राच्या घराभोवती कुंपणच नाही. असं असूनही आपल्या श्रीमंत मित्राकडे त्याने एक दमडीही मागितली नाही. मात्र कुलबिंदर हे कुंपण बांधणार आहे, धोनीच्या ‘त्या’ 320 स्टम्प्सनी. त्यामुळे धोनी जितके अधिकाधिक विजय मिळवेल, तितकीच कुलबिंदरला स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला मदत होईल. स्टम्प्सची ही दंतकथा खरी ठरो, याच शुभेच्छा
टीम इंडियाच्या प्रत्येक विजयानंतर कॅप्टन कूल धोनी स्टम्प काढून नेताना प्रत्येक क्रिकेट चाहत्याने पाहिलं असेल. मात्र धोनीला ही सवय का लागली, याचं कारण तुम्हाला माहित आहे का? धोनीच्या बालपणात या गोष्टीचं गुपित दडलं आहे.