मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार?
दरम्यान, रेल्वेच्या वाढत्या दुर्घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा सादर केला होता. पण पंतप्रधानांनी तो स्वीकारलेला नाही. मात्र रेल्वेखातं आता नितीन गडकरींना दिलं जाण्याची चर्चा आहे. तर सुरेश प्रभूंना पर्यावरण खात्याचा भार दिला जाण्याची चिन्हं आहेत.
अनिल दवे यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रालयाचा भार हर्षवर्धन यांच्याकडे आहे.
मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं. त्याचा भार अरुण जेटलींवर सोपवण्यात आला आहे.
सध्या मोदींच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी अन्य मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.
दुसरीकडे शिवसेनेला अजून दोन मंत्रिपदांची अपेक्षा आहे. एकीकडे 12 खासदार असलेल्या जेडीयूला जर 2 मंत्रिपदं मिळत असतील तर त्यापेक्षा दुप्पट खासदार असून शिवसेनेवर अन्याय का? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
हाराष्ट्रातून संघाच्या मुशीतून घडलेले विनय सहस्त्रबुद्धे, शिवसेनेचे अनिल देसाई, आनंदराव अडसूळ यांच्यासह मराठा समाजाचा चेहरा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचंही नाव चर्चेत आहे.
त्यामुळे दिल्लीत नव्या नावांच्या चर्चेला उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.