कधीकाळी संघाच्या कार्यक्रमात 'यांची'ही हजेरी, मुखर्जींची का अॅलर्जी?
2014 साली श्री श्री रविशंकर यांनी संखाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.
महात्मा गांधींनी पुन्हा एकदा 1947 साली संघ स्वयंसेवकांसमोर भाषणही केलं होतं.
महात्मा गांधींनी 1934 साली वर्ध्यातील संघ शिबिराला भेट दिली होती.
माजी सेनादल प्रमुख के एम करिअप्पा यांनीही संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं होतं.
माजी राष्ट्रपती डॉ झाकिर हुसेन यांनीही संघ संमेलनात हजेरी लावली होती.
जयप्रकाश नारायण यांनीही 1977 साली संघशिक्षा वर्गासमोर भाषण केलं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही 1939 साली पुण्यातील संघशिक्षा वर्गाला भेट दिली होती.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. काँग्रेसमधील ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या संघाच्या कार्यक्रमातील सहभागामुळे सर्वच स्तरांमधून प्रश्न विचारले गेले. मात्र प्रणव मुखर्जी हे संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावणारे पहिले नेते नाहीत.