वादळाला 'ओखी' नाव कुणी दिलं?
बदललेल्या जागेनुसार वादळाला नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंडने नावे ठरवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली आहेत.
प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४ नावे ठरवलेली आहेत.
२००० सालापासून वादळाला नाव देण्याची पद्धत सुरु झाली आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ‘ओखी’ चक्रीवादळाची निर्मिती झाली.
‘ओखी’ या बंगाली भाषेतील शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले आहे.
केरळ, तामिळनाडू, लक्षव्दीप आणि आता महाराष्ट्र, गुजरातमध्ये ‘ओखी’ वादळानं अक्षरश: थैमान घातलं आहे. पण या वादळाचं नाव ‘ओखी’ कसं पडलं आणि वादळांना नावं कशी दिली जातात हे देखील फारच रंजक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -